जादूटोणा विरोधी कायद्याबाबत ‘अंनिसतर्फे’ मार्गदर्शन व प्रात्यक्षिक तळेबाजार येथे संपन्न…

देवगड : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सिंधुदुर्गतर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर प्रात्यक्षिका सह व्याख्यान झाले. महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१३ मध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध करणारा कायदा म्हणजेच जादूटोणा विरोधी कायदा समंत केला.मात्र,त्याचा म्हणावा तसा प्रसार व प्रचार न झाल्या मुळे,अ.भा अनिस चे संस्थापक प्रा.श्याम मानव यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर या कायद्याची जनजागृती करण्यात येत आहे.जादूटोणाविरोधी कार्याद्याअंतर्गत येणाऱ्या बारा कलमांचे मार्गदर्शन व त्यावर आधारित छोटे छोटे प्रयोग प्रात्यक्षिकांचे आयोजन अंनिसचे जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर,जिल्हा संघटक समीर साळकर यांनी केले होते.त्या साठी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यासाठी कोषाध्यक्ष अनिल चव्हाण व सरचिटणीस विजय चौकेकर यांनी महात्मा गांधी विध्यामंदिर, तळेबाजार या ठिकाणी जादूटोना विरोधी कायदा या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान आयोजित केले होते. कोणत्याही बुवा व बाबाच्या नादी न लागता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन आपण समाजात वावरत असताना या भोंदूबाबांन कडे न जाता आपण एक आपला वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबणे गरजेचे आहे. या वेळी महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदया विषयी विध्यार्थ्यांमध्ये माहिती देण्यात आली. या जादूटोण्या विषयी काही ढोंगी व पाखंडी बुवा व बाबांच्या नादी लागून काहींनी आपली कशी मुले गमावलीत तर काही या बाबांच्या नादी लागून भूत बादेचा समज करून घेत आपल्या कुटुंबातील स्त्रीयांना या अश्या ढोंगी बाबाच्या स्वाधीन करून आपल्या परिवारातील स्त्रीयांना गमावले,असे हे प्रकार आपण या पुढे रोखू शकतो.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या विरोधात काम करत आहे. आमचा कोणत्याही देवतेला आमचा विरोध नसून या समाजातील अंधश्रद्धेचे अवास्तव अवडंबर माजवले जाते त्या गोष्टीचा स्तोम माजऊन काही ढोंगी बाबांच्या नादी लागून काही कुटूंब उद्ववस्थ झाली आहेत.या गोष्टीना वेळीच आळा बसून आमची संस्था हि समाज प्रबोधनाचे काम करीत आहे.असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखा सिंधुदुर्ग वतीने मार्गदर्शन कार्यक्रमात शाळेतील विदयार्थी,शिक्षक,यांना संबोधित करून प्रबोधन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे,शाळेचे मुख्याध्यापक नंदन घोगळे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर,कोषाध्यक्ष अनिल चव्हाण,चंद्रशेखर चौकेकर, खजिनदार संतोष वरेरकर,तसेच शिक्षक,विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.