मणिपूर : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगली या देशासाठी चिंतेचा विषय झाल्या आहेत. तिथला एक भयंकर व्हीडीयो समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल या मणिपूरमध्ये पोहोचल्या आहेत. यावेळी बोलतांना स्वाती मालिवाल म्हणाल्या कि,“मी इथे राजकारण करण्यासाठी आलेली नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना मणिपूरला येण्याची विनंती करणार आहे. मी येथे राज्यपालांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे.”मी थेट मुख्यमंत्री कार्यालयात जाईन, मला मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांना भेटायचे आहे. मला लैंगिक शोषणाच्या पीडितांनाही भेटायचे आहे आणि त्यांना कायदेशीर मदत, समुपदेशन किंवा कोणतीही भरपाई मिळाली आहे का? ते पाहायचे आहे. मी मणिपूर सरकारला आवाहन करते की मी येथे फक्त राज्यातील लोकांना मदत करण्यासाठी आली असून कृपया मला तसे करण्याची परवानगी द्यावी, असेही दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल म्हणाल्या.
Home ब्रेकिंग न्यूज मोदीं अन् स्मृती इराणींनी मणिपूरला भेट द्यावी.! | दिल्ली महिला आयोग्याच्या अध्यक्षा...





