आचरा : बंधऱ्याला कामाला अटकावं करणाऱ्याची सुपारी देण्याच्या संशयावरून आचरा येथील तौकिर जुम्मंन शेख याच्याशी आचरा डोंगरेवाडी पारवाडी युवकांमध्ये आचरा तिठ्यावर वाचाबाची झाली . काहीवेळाने तौकीर व संशयित दोघांनी दुचाकी वरून येत आचरा देवगड रोडवर रामेश्वर मंदिर फाट्यानजिक बाचाबाचीत सहभागी झालेल्या युवकांच्या तवेरा गाडीसमोर दुचाकी आडवी घालून फायरिंग करत गाडीतील युवकांवर चॉपर ने हल्ला केला. या हल्ल्यात एक युवक जखमी झाला असून ही घटना गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. घटना कळताच जमा झालेल्या जमावाने त्याना अडवत पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले .यामध्ये सहभागी असलेल्या आणखी दोघांनी पलायन केले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनीं सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आचरा तिठ्यावर लोकांची गर्दी जमा झाली होती.
घटनेचे गंभीर्य ओळखून आतरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे आचरा आरोग्य केंद्राकडे दाखल झाले होते. घटनास्थळी चार पुंगळ्या आढळून आल्या होत्या.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार आचरा तिठानजीक येथे सायंकाळी चारच्या सुमारास तौकिर या युवकांने आपणास मारण्याची सुपारी घेतली आहे या संशयावरून सदर युवकांस आचरा डोंगरेवाडी,पारवाडी येथील युवकांनी जाब विचारला यावेळी तेथील युवक व तौकीर मध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. त्यानंतर तो निघून गेला काहीवेळानंतर आणखी सहकारी घेऊन येत बाचाबाची करणाऱ्या युवकांच्या तवेरा गाडीसमोरं दुचाकी आडवी घालून जाब विचारत फायरिंग केली . त्यानंतर गाडीतील गौरव पेडणेकर या युवकाच्या डाव्या हातावर वार करत दुचाकी वरून पळून जात असताना त्यांची गाडी स्लिप झाल्याने गाडी तिकडेच टाकत संशयित पळून जाऊ लागले.
भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या घटनेने यावेळी उपस्थित लोकांनी त्यांचा पाठलाग करत दोघाना पकडले . तर दोघेजण पळून गेल्याचे बोलले जात होते. यात प्रत्यशदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार फायरिंग करणारा शुभम जुवाटकर व दुचाकी चालवणारा प्रतिक हडकर यांना जमवाने पोलीस येईपर्यंत पकडून ठेवले होते . मिळालेल्या माहितीनुसार शुभम जुवाटकर हा मालवण दांडी तर दुचाकी चालवणारा प्रतिक हडकर हा चिंदर येथील असल्याचे समजते.
जमावाबरोबर झालेल्या झटापटीत जुवाटकर याच्याकडील रिवाल्वर आणि चॉपर रस्त्यावर पडले होते. संशयितला पकडून ठेवलेल्या ठिकाणी पाकिट व चिलीम पडलेली होती . त्या वस्तू फायरिंग करणारा जुवाटकर याने फेकल्या असल्याचे ग्रामस्थ बोलत होते. आचरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे व पोलीस अक्षय धेंडे,मनोज पुजारे,बाळू कांबळे दाखल झाले होते . आचरा पोलिसांनी पकडलेल्या दोघाना ताब्यात घेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत पुढील कारवाई सुरु केली होती .
घटनेनंतर जमा झालेले आचरा ग्रामस्थ आक्रमक झाले होते . झालेल्या घटनेमुळे गावाची बदनामी झाली असून या घटनेत गुंतलेले संशयित हे चरस गांजाच्या व्यवसायात गुंतलेले असून तरुण पिढी बरबाद करत आहेत . फायरिंग आणि चॉपर हल्ला एवढ्याच घटनेची चौकशी न करता चरस गांजाचे रॅकेट चालवणाऱ्या या टोळीच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली . या फायरिंच्या घटनेमागे आणखीन काहीचा हात असणाऱ्यांना ताब्यात घेण्याची मागणी उपस्थितांनी केली . धोंडी चिंदरकर,जेरोन फर्नांडिस ,राजन गावकर , महेश राणे , बाबू कदम अभिजित सावंत , मंदार सरजोशी , प्रशांत गावकर आणि बहुसंख्य ग्रामस्थ हजर होते.वाढत्या गर्दीला काबूत आणण्यासाठी पोलीसांना काही काळ आक्रमक पवित्रा घ्यावा लागला होता .





