बांदा : मडुरा येथील श्री देवी माऊलीचा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार ५ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी स्थानिकांची भजने होतील. रात्री ९.३० वाजता तरुण हौशी नाट्यमंडळ मडुरा रेडकरवाडी यांचे ‘गीता गाती ज्ञानेश्वर’ हे संगीत संतकालीन नाटक होणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान उपसमिती यांच्यामार्फत करण्यात आले आहे.





