भर वस्तीत करणार ब्लास्टिंग…? | घरांना तडे गेल्यास जबाबदार कोण..?

सावंतवाडी : निगुडे गावातून गेलेल्या कालव्यात गावात एका ठिकाणी एक खडक मिळाल्याने त्या ठिकाणी ब्लास्टिंग करण्याची खटाटेप आहे. मात्र, हे ब्लास्टिंग करण्यासाठी शासनाची आवश्यक असणारी परवानगी नसल्याचा आरोप माजी सरपंच आत्माराम गावडे यांनी केला आहे. तसेच जिथं ब्लास्टिंग होणार आहे त्या परिसरात घरांच्या होणाऱ्या नुकसानी संदर्भात पंचनामे करावी अशी मागणीही आत्माराम गावडे यांनी केली आहे.

या संदर्भात संबंधित विभागाशी अर्ज विणवण्या करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याचं माजी सरपंच आत्माराम गावडे आणि माजी पंचायत सदस्य प्रताप गावडे यांनी सांगितलं.

शासनाची कोणतीही परवानगी नसताना भर गावात अशा प्रकारे ब्लास्टिंग कशाच्या निकषांवर होणार असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.