मळगाव इंग्लीश स्कुलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

सावंतवाडी :  मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचा ६२ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन काल मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी वा. भ. कांबळी स्मारक रंगमंच व ऍडव्होकेट जीवाजी नारायण पाडगावकर सभागृहात पार पडला. यावेळी गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार, पारितोषिक वितरण व गुणगौरव करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मळगांव ऐक्यवर्धक संघ, मुंबईचे सचिव आर. आर. राऊळ,प्रमुख अतिथी म्हणून म्हापसा-गोवा येथील उद्योजक अशोक झारापकर, शाळा समितीचे अध्यक्ष मनोहर राऊळ,मुख्याध्यापक एम. बी. फाले सर,संस्था संचालक बाप्पा नाटेकर व रामचंद्र केळूसकर, माजी मुख्याध्यपिका श्रद्धा सावंत, माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक सर, प्राध्यापक शरद शिरोडकर, शाळा कमिटी पदाधिकारी दिपक जोशी, माजी मळगांव ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गावकर, उदय खानोलकर वाचनालयाचे कार्यवाहक गुरुनाथ नार्वेकर, दैनिक प्रहारचे पत्रकार सचिन रेडकर,दैनिक तरुणभारतचे पत्रकार निलेश परब, कोकण लाईव्ह न्यूज चॅनेलचे पत्रकार सुखदेव राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी उद्योजक अशोक झारापकर,गुरुनाथ गावकर यांनी, उपस्थित गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना संबोधित केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. आर. राऊळ यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत विविध प्रांतिक वेशभूषा केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीर्नीच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील शालेय तसेच विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा आदी मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश तिवरेकर सर यांनी केले. तर शाळेचा वार्षिक अहवाल वाचन सावंत भोसले मॅडम यांनी केले. तर रोख रक्कम पारितोषिक वितरणाचे वाचन व्ही.व्ही आर सावंत सर यांनी केले.क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रम वाचन एस. आर. कारिवडेकर सर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. बी. फाले सर यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस. व्ही. कदम सर यांनी केले.तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थीनीनी मंजुळ स्वरात ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.तसेच विदर्थिनींनी विविध प्रांतिक वेशभूषा करुन विविध भाषेत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.