मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या जयंतीनिमित्त ‘ ई ‘ विभागाचे सहाय्यक आयुक्त (प्रभारी) श्री. अजयकुमार यादव यांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील बाल शिवाजीसह जिजाऊंच्या पुर्णाकृती शिल्पास आज (दिनांक १२ जानेवारी, २०२३) सकाळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





