काजूसाठी जे गोव्याने केलं ते महाराष्ट्राला कधी जमणार ? | काजू पिकाला न्याय देण्यासाठी सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी मैदानात…

234

सिंधुदुर्ग : काजू या पिकाला १५० रूपये हमीभाव दिला व काजू बोंडू पासून पेय व मद्यार्क तयार करणे यासाठी योजना जाहिर केल्याबद्दल गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री. प्रमोद जी सावंत यांच्याशी सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष श्री. विलास सावंत व शेतकऱ्यांनी आज गोवा साखळी येथे रविंद्र भवन मध्ये भेट घेतली. साखळी मधील नावेली गावचे सरपंच श्री. कालिदास जी गावस यांच्या सहकार्याने आजची ही भेट व चर्चा झाली.

मार्च एंडिंग ला झालेल्या गोवा राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य शेतकन्यांच्या पिकाला १५० रूपये हमीभाव देऊन गोवा शासनाने अर्थातच मुख्यमंत्री श्री. प्रमोद गोवा शेतकयांना शाश्वत केल. काजू पिकावा उत्पादन खर्च हा १२० रूपये ते १२५ रूपये किलोमागे आहे अस असताना बाजारभाव मात्र ११०-११५ पर्यंत गडगडल्याने गोवा शासन शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभे राहिल आणि त्यांनी शेतकऱ्यांना अपेक्षित १५० रूपये हमीभाव दिला.

या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हयातील काजू पिकाला हमीभाव देता येईल किंवा बोडू या फळावर काय प्रक्रिया करता येतील या संदर्भात आज की चर्चा आली. सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडयूसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष श्री. विलास सावंत व इतर त्यांनी आज यावर विस्तृत चर्चा माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी केली. महाराष्ट्राच्या दापोली कृषी विद्यापीठाने काजू बी चा उत्पादन खर्च हा प्रतिकिलो १२२ रूपये ५० पैसे काढला असून आज सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत बांदयामध्ये ज्या परिसरात जी आय मानांकन असलेल्या काजूचं मोठ उत्पन्न घेतल जात त्या काजूबीचा दर आज ११४ ते १२० रुपये आहे.

खरतर हा दर मागील तीन-चार १४० च्या आसपास होता. कारखानदार ही १४० रूपये ते १५० रूपयापर्यंत काजू खरेदी आहेत असे अनेक वतव्य त्यांच्या मिटिंग मधून वृत्तपत्रातून असोसिएशन जाहिर झालेले आहेत आणि त्या दराने त्यांनी काजू खरेदी ही केलेली आहे असं असताना शेतकरी व कारखानदार याच्यामध्ये जो व्यापारी वर्ग आहे त्याने आपले स्वतःचे भांडवल गुंतवून दर कमी करून काजू खरेदी करायचा व कारखानदार खरेदीसाठी रिंगणात उतरले कि दर चढया भावाने वाढवून कारखानदारांनी विकायचं असा नवीन ट्रेड या तीन-चार वर्षात व्यापाऱ्यांनी काढला आहे. त्यामुळे प्रचंड कष्ट करणारा शेतकरी वर्ग नाव उमेद नाराज होऊन अतिशय बकाल परिस्थितीत जगत आहे.

अशा परिस्थितीत गोवा शासनाने १५० रूपये दर देऊन एक नवीन आशा जिल्हयातील शेतकऱ्यांसमोर निर्माण केली आहे. गोवा शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनही काजू बी बाबत सकारात्मक निर्णय घेईल व महाराष्ट्र शासन ही १६० च्या आसपास काजूला हमीभाव देईल असा आशावाद श्री. प्रमोद जी सावंत यांनी व्यक्त केला आहे. गोव्यातील काजू मद्यार्क तयार करणारे उद्योजक आजपर्यंत सिंग्टर्ग जिल्हयातील काही भागातून विदाऊट लायसन्स काजू बोंडू खरेदी करत होते. मात्र आता गोवा सिंधुदुर्गातील काजू बोंडू खरेदी करण्यासाठी त्यांना लायसन्स देण्याचे जाहिर केले आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हयातील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होणार आहे असेही मत मुख्यमंत्री प्रमोद जी सावत यांनी व्यक्त केले.

या चर्चेत शेतकरी श्री. मिलिंद शेटकर, श्री. राजेश सावंत, श्री. मयूर परब, श्री. गणपत गवस यांनाही या चर्चेत भाग घेतला. गोवा व सिंधुदुर्ग जिल्हयातील भौगोलिक परिस्थिती व पिके समान असल्याने निश्चितच महाराष्ट्र शासन याचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय देईल अस मत यावेळी मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.गोव्यातील काजू बोंडू खरेदी सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यात मुख्यत्वे होत असून या परमीट मुळे संपूर्ण जिल्हयातील काजू बोंडू खरेदीचा मानस सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीने व्यक्त केला आहे. काजूला किमान १६० रू. हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी व फळबागायतदार संघ सावंतवाडी दोडामार्ग व सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी सिंधुदुर्ग पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांना भेटून चर्चा करणार आहेत. या चर्चेतून मागणी मान्य न झाल्यास जिल्हाभर काजू शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू करण्यात येईल असे श्री. विलास सावंत, श्री. सुरेश गावडे, श्री. दिवाकर मावळणकर, श्री. साबा चुरी, श्री नारायण आसोलकर, श्री. अरूण पंडित श्री. संदिप उत्तम नाईक यांनी जाहिर केले.