देवगड : सिंधुदुर्ग,रत्नागिरी सह कोकणपट्ट्यात पारंपारिक मच्छीमारांसाठी एलइडी मासेमारी हा सर्वात अडचणीचा विषय ठरलेला आहे. या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचे फार मोठे नुकसान होते,त्यामुळे ही एलईडी पद्धतीची मासेमारी थांबविली जावी.केद्रसरकार आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय करून एलईडी मासेमारी बंद करावी. अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात मांडली.
एलईडी पद्धतीची मासेमारी बंद होणार काय ? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात विचारणा केल्याने यावर मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या प्रश्नावर एकत्रित चर्चा करून प्रश्न सोडविले पाहिजेत त्यात एलईडी मासेमारी प्रश्न आहे. यावर लवकरच निर्णय घेवू असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अनेक निर्णय सकारात्मक घेतलेले आहे. गिर्ये येथील मत्स्य महाविद्यालयाची उभारणी असेल, डिझेल परतावा असेल. असे सर्व विषय त्यांनी योग्य पद्धतीने हाताळले आहेत. एलईडी मासेमारी हा त्याच पद्धतीने विषय हाताळावा आणि पारंपरिक मच्छीमारांचा त्रास संपवावा अशी मागणी केली.आपण अनेक चागलं निर्णय घेतो मात्र एलईडी मासेमारी मुळे आणखीन प्रश्न निर्माण होतात ते सोडवावेत अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.





