वाफोली धरणानजीक पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ सुरु करावे : संजय आईर, अन्यथा ८ मार्चपासुन बेमुदत आंदोलन

बांदा : बांदा आंबोली मार्गावरील वाफोली धरणा नजीक पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ सुरु करावे अशी मागणी  सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्य‍ाकडे वाफोली गावचे सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी केली आहे. संबधित ठेकेदारांकडून आठ दिवसांत काम सुरु न  केल्यास ८ मार्च रोजी वाफोली धरण जवळील  पुलावर बसून बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा आईर यांनी दिला आहे.

बांदा  आंबोली मार्गावर वाफोली धरणानजीक पुलाचे काम नाबार्ड योजनेअंतर्गत सुमारे ७५ लाख खर्च करुन काम गेल्या मार्च अखरीस पुर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूने मजबुतीकरण व डांबरीकरण रस्ता अपूर्ण आहे. रस्ता पुर्णपणे खड्डेमय झालेला आहे. वाहनचालकास मोठी कसरत करावी लागत आहे.

गतवर्षी पावसाळ्यात चिखलाचे सामाज्र पसरल्याने अपघात झाले होते. सद्या फेब्रुवारी अखरीस रस्ता पुर्णत: खड्डेमय व धुळीमुळे  वाहन धारकांना वाहने चालविताना नाहक त्रास होत आहे. अशा परीस्थीतीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याला संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णत: जबाबदार आहे. असे आईर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कोल्हापुर पुणे गोवा येथे जाणारे  पर्यटक जवळचा मार्ग असल्याने  ये जा करत असल्याने  मार्गावर  मोठ्या संख्येने गाड्यांची रेलचेल असते.  फोटो :  वाफोली धरणा नजीक  पुलावरील रस्ता खड्डेमय झाला आहे.  रस्त्याचा अंदाज येत नसल्य‍ने अपघात होण्याची शक्यता आहे.