वैद्यकिय सुविधा सुरू होईपर्यंत धरणे आंदोलन सुरूचं…!

दोडामार्ग : ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह लोकार्पण कार्यक्रम केला होता. मात्र आरोग्य सेवा सुरळीत न झाल्याने त्यांनी धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. यानंतरही शासनाची काहीच हालचाल होत नसल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग संबधित आंदोलाकांनी स्वीकारला होता.

यावेळी आरोग्य विभाग सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांनी दखल घेत स्थानिक आमदार व मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत २९ फेब्रुवारी पर्यंत लोकार्पण केले जाईल असे पत्र दिले. यावर आंदोलकांनी आमरण उपोषण स्थगित करत धरणे आंदोलन वैद्यकिय सुविधा सुरू होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.