वैभववाडी (प्रतिनिधी)
वैभववाडी शहरात घरात आढळला ७ फुटी अजगर
वैभववाडी शहरात सांगुळवाडी रोड नजिक साळवी यांच्या घराच्या पडवीमध्ये भला मोठा अजगर सकाळी आढळून आला. अजगराला पाहून सर्वांची बोबडी वळली. नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर घराच्या बाहेर झाडलोट करत असताना, घराच्या पडवीत साधारण ७ फुटांचा अजगर वेटोळे घालून पडवीच्या कोपऱ्यात आढळला. अजगरला पाहून सर्वांची एकच धावपळ उडाली. घरात अजगर असल्याचे समजताच त्याला पहाण्यासाठी शहरात एकच झुंबड उडाली. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. तसेच कोकिसरे येथील सुप्रसिद्ध सर्पमित्र कांता मेस्त्री यांना बोलण्यात आले. त्यांनी मोठया शिफशीने या अजगरला यपकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी वनरक्षक वैशाली कांबळे, दिपाली पाटील उपस्थित होत्या.





