देवगड (प्रतिनिधी)
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मान्यता ; रीड अँड शाईन प्री-प्रायमरी स्कूल देवगड तालुक्यातील पहिली मान्यता प्राप्त शाळा
जामसंडे, देवगड (ता.) येथील *रीड अँड शाईन प्री-प्रायमरी स्कूल* यांना Pre Primary School Accreditation Council of India, मुंबई यांच्याकडून गुणवत्ता मानांकन (Accreditation) प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता, सुरक्षितता, मूल्यमापन पद्धती, शिक्षक प्रशिक्षण, आणि पालक संवाद यामधील उत्कृष्टतेच्या मूल्यांकनानंतर ही मान्यता देण्यात आली.





