दापोली येथून माहेरी आलेल्या विवाहितेचे जामसंडे खाजगी रुग्णालयात उपचारादम्यान निधन

31
देवगड / प्रतिनिधी

 

दापोली येथून माहेरी आलेल्या विवाहितेचे जामसंडे खाजगी रुग्णालयात उपचारादम्यान निधन

मोंड- मळेगाव अनभवणेवाडी येथे आपल्या माहेरी आलेल्या सौ. अंजली रूपेश कडव (२५, मूळ चांदिवडी- देहेन, ता. दापोली, जि. रत्नागिरी) या विवाहितेचे जामसंडे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. सौ. अंजली ही काविळच्या आजाराने त्रस्त होती. ही घटना बुधवारी पहाटे २ वा. च्या सुमारास घडली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. अंजली ही काविळच्या आजाराने त्रस्त होती. त्यामुळे ती मोंड- मळेगाव अनभवणेवाडी येथे आपल्या माहेरी आली होती. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे २ वा. च्या सुमारास तिचे निधन झाले. या घटनेची फिर्याद सौ. अंजली हिचे वडील अनिल दिनकर अनभवणे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव करीत आहेत.