कणकवली दि ४ डिसेंबर(प्रतिनिधी)
परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ ; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…!
योगियांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४७ व्या पुण्यतिथी महोत्सवास बुधवारी भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्त पुढील चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
आज बुधवारी पहाटे भालचंद्र महाराज यांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात आले. पहाटेच्यावेळी भक्तांनी काकड आरती करत वातावरण भक्तिमय केले. सकाळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात सर्व भक्तांच्या कल्याणार्थ भालचंद्र महारुद्र, महाभिषेक अनुष्ठान केला. या विधीला अमेय धडाम दांपत्याच्या हस्ते महाभिषेक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी भालचंद्र संस्थांचे अध्यक्ष व कमिटीचे पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते.





