देवगड, दि.०४ डिसेंबर
विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या सतर्कमुळे मिळाले जीवदान
देवगड येथील समर्थ प्लाझा सोसायटीच्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले त्याला विहिरीतून बाहेर काढून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.सदरची घटना बुधवारी सकाळी निदर्शनास आली.
मिळालेल्या माहितीनुसार देवगड येथील समर्थ प्लाझा सोसायटीच्या विहिरीत कोल्हा पडला असल्याची खबर पोलीस हवालदार प्राची धोपटे यांनी दिली.उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व सुनील लाड सहाय्यक वनरक्षक वनजीव व राजेंद्र घुनकीकर वनशेत्र पाल यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण परीट वनपाल देवगड व रामदास घुगे वनरक्षक आप्पासाहेब राठोड वनरक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विहिरीत पाणी नव्हते वीर पूर्णतः कोरडी असून त्यामध्ये कचरा साचलेला होता ग्रामस्थ स्वप्नील कुबल,योगेश देवगडकर,जलाल डोंगरकर मदतीने व जाळीच्या साह्याने विहिरीत पडलेला कोल्ह्याला विहिरीतून यशस्वीरित्या व सुखरूप बाहेर काढले व त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.





