गोवा बनावटीची दारू जप्त ; एकूण ६१ लाख ५८ लाखाचा मुद्देमाल जप्त ; झाराप येथे राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ पथकाची कारवाई

55

 

बांदा (प्रतिनिधी)

गोवा बनावटीची दारू जप्त ; एकूण ६१ लाख ५८ लाखाचा मुद्देमाल जप्त ; झाराप येथे राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ पथकाची कारवाई

ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर  निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुडाळ  प्रथकाने बुधवारी  पहाटेच्या सुमारास झाराप मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरा गोवा बनावटी बेकायदा दारु वाहतुकीवर कारवाई केली. या कारवाईत ५१ लाख २८ हजार दारुसह एकून ६१ लाख २८हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सोबत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. 

निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ कार्यालयातून मिळालेली माहीती अशी की,
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिंधुदूर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ व स्टाफ असे सर्वजण मिळून मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार खाजगी वाहनाने गाव मौजे झाराप येथील गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे थांबुन दारुबंदी कायद्यांतर्गत वाहनांची तपासणी करीत असताना  सहाचाकी वाहन (डी डी ०१ एच ९९४१) वाहन गोव्याच्या दिशेवरुन मुंबईच्या दिशेने येताना दिसून आले. सदर वाहनाची दारुबंदी गुन्हयांतर्गत तपासणी केली असता  महाराष्ट्र राज्यात विक्रीकरीता  गोवा बनावटी दारुचे विविध ब्रँन्टचे  १०२० बॉक्स जप्त. वरील मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले सहाचाकी वाहनासह एकूण ६१ लाख २८ हजार  किंमतीचा मुद्येमाल दारुबंदी गुन्हयांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. सदर कारवाईमध्ये संशयित ओम प्रकाश गुप्ता (वय-३२ वर्षे रा. घनसोली, नवी मुंबई),  शिव लखन केवट (वय३० वर्षे रा. तुर्क गोंदर गढी रीवा मध्यप्रदेश) या दोन्हीही इसमांना वाहनासह जागीच ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरील कारवाई  राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग अधीक्षक मनोज शेवरे, यांच्या मागदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ  निरीक्षक एम.एस. गरुड ,  यांनी केली. सदर कारवाईमध्ये  दुय्यम निरीक्षक आर.बी. मोरे , दुय्यम निरीक्षक  यु.एस. थोरात ,  दुय्यम निरीक्षक ए.ए. वंजारी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रमाकांत ठाकूर, जवान नि वाहनचालक   एस.एम. कदम , जवान एन.पी. राणे जवान, व्ही. एम. कोळेकर यांनी मदत केली.

पुढील तपास  राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ एम.एस. गरुड निरीक्षक करीत आहेत.