देवगड (प्रतिनिधी)
मत्स्यव्यवसायातील पारंपारिक संस्कृती व पारंपारिक व्यवसाय लोकांसमोर आणण्याचे काम रापण महोत्सवाच्या माध्यमातून – उद्योजक प्रकाश गायकवाड
राज्यात पर्यटनाच्या माध्यमातुन गोवा राज्य हे जगाच्या नकाशावर झळकले आहे.आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याची ताकद पर्यटन व्यवसायात आहे. मत्स्यव्यवसायातील पारंपारिक संस्कृती व पारंपारिक व्यवसाय लोकांसमोर आणण्याचे काम रापण महोत्सवाच्या माध्यमातून केले जात आहे हे कौतुकास्पद असून असेच महोत्सव विविध क्षेत्राद्वारे आयोजित करून आपली संस्कृती व पारंपारिकता टिकवून ठेवली पाहिजे.दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर पर्यटनस्थळी रापण महोत्सव आयोजित करून पर्यटनाचे दालन खुले केले असे गौरवद्गार प्रकाश गायकवाड यांनी काढले.





