देवगड (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेश्वर कातवण जिल्ह्यात प्रथम 11 लाखाचे पारितोषिक
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेश्वर कातवण या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कोल्हापूर विभागासाठी पात्र ठरली आहे .
गेल्यावर्षीसुद्धा कुणकेश्वर कातवण शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. याबद्दल सर्व स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे.जिल्हास्तरीय मूल्यांकनासाठी सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी मा. डॉ. गणपती कमळकर साहेब, डाएट अधिव्यख्याता श्री.डॉ लवू आचरेकर, उपशिक्षणाधिकारी श्री. शंभोराज शेर्लेकर, श्री. प्रजापती थोरात, श्री.मेंगाने साहेब यांनी परीक्षण केले होते.
वाचनालय,संगणक कक्ष वर्गखोल्या, प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, कचरा पाणी पुनर्रवापर, विद्यार्थी शिक्षक अभिलेखे, महावाचन चळवळ, विद्याजली पोर्टल, स्वच्छता मॉनिटर, स्पर्धा, शालेय गुणवत्ता,शाळा व्यवस्थापन समिती,पालक सहभाग, वृक्षारोपण,विद्यार्थी सुरक्षा, पर्यावरण पूरक शाळा अशा विविध मुद्यांचे परीक्षण करण्यात आले. कुणकेश्वर कातवण शाळेतील पालक ग्रामस्थ यांनी श्रमदान व लोकसहभागातून केलेल्या कामाबद्दल, शाळेने राबविलेल्या उपक्रमाबद्दल समितीने समाधान व्यक्त केले. यासाठी ग्रामपंचायत कुणकेश्वर,व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, कुणकेश्वर कातवण ग्रामस्थ, मुबंईस्थित ग्रामस्थ,पालक, आजी माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
शाळेचे मुख्याध्यापक श्रीम. दिपाली ढोके, शिक्षक श्री. धर्मराज धुरत, श्री. सोमनाथ माने, हेमंत पराडकर, स्वयंसेवक आकांक्षा कासले याचे सरपंच श्री. महेश ताम्हणकर, उपसरपंच शशिकांत लब्दे,देवस्थान अध्यक्ष संतोष लब्दे, अध्यक्ष श्री. प्रदीप मुणगेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोईल श्री. राजा गावडे, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे. यासाठी गटविकास अधिकारी सन्माननीय वृक्षाली यादव, गटशिक्षणाधिकारी श्री.श्रीरंग काळे, विस्तार अधिकारी श्री. सुदाम जोशी, केंद्रप्रमुख श्रीम. भाग्यश्री जोईल यांचे मार्गदर्शन लाभले.





