देवगड तहसील कार्यालयात जनतेची कामे प्राधान्याने होत नसल्याने शिवसेना उबाठा पक्षाकडून १७ रोजी धरणे आंदोलन

9

देवगड तहसील कार्यालयात जनतेची कामे प्राधान्याने होत नसल्याने शिवसेना उबाठा पक्षाकडून १७ रोजी धरणे आंदोलन

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यातील नागरिकांना देवगड तालुक्यातील नागरिक बहुतांश शासकीय कामासाठी देवगड येथे तहसीलदार कार्यालय येथे येत असतात मात्र या ठिकाणी नागरीकांना आवश्यक त्या सुविधा देत असताना प्रशासनाकडून चाल ढकल होत होत असल्याने बहुतांशी जनतेच्या कामाला विलंब लागतो. यासंदर्भात शिवसेना उबाठा सेनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद साटम, जयेश नर यांनी देवगड तहसीलदार यांना निवेदनाद्वारे ही बाब लक्षात आणून दिली असून या कामात सुधारणा झाली नाही तर १७ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन आज देवगड तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांच्याकडे देण्यात आले .

या निवेदनात म्हटले आहे की, देवगड तालुका शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षातर्फे आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, देवगड तालुक्यातील नागरीकांना आवश्यक त्या सुविधा देत असताना प्रशासनाकडून जाणीवपूर्वकरित्या चाल ढकल होत असते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची मोठी फरफट होत आहे. कित्येक नागरीकांना रेशन मिळणारे रेशनकार्ड असूनही धान्य वितरीत होत नाही. संबंधीत खात्याचे अधिकारी जाणीवपूर्वक चालढकल करतात. त्याचप्रमाणे जल जीवन मिशन अंतर्गतची विकास कामे अर्धवट व निकृष्ट दर्जाची केली
जात आहे.

तसेच तालुक्यातील आंबा, काजू, भातशेती, पिक विमा व मच्छीमार यांचा डीझेल परतावा मिळण्यासाठी अजून कोणतेही ठोस पाऊल अधिकारी व प्रशासन यांनी उचलले नाही.त्यामुळे संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी, जल जीवनचे ठेकेदार, विमा कंपनी यांचावर लवकरात लवकर कडक कारवाई करून सामान्य जनतेला न्याय मिळावा. अन्यथा दिनांक १७
ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वा. शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाकडून लोकशाहीच्या मार्गाने आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

          यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम,तालुका प्रमुख जयेश नर, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर आधी सह शिवसेना (उ. बा. ठा.)सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.