संविधानाने दिलेल्या आरक्षणाचे रक्षण आमदार नितेश राणेच करू शकतात – दीपक जाधव
तळवडे देवगड येथील प्रतिष्ठित नागरिक दीपक रघुनाथ जाधव भाजपामध्ये दाखल
देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील तळवडे येथील प्रतिष्ठित नागरिक दीपक रघुनाथ जाधव यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थिती भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश असून भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली येथे भव्य आरक्षण बचाव मोर्चा झाला. यानंतर अनेक आंबेडकरवादी जनतेने भाजपामध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी भाजपा पक्ष व आमदार नितेश राणे हे सक्षम असल्याचे जाधव यांनी नमूद केले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात केलेल्या विकासकार्यांबद्दल बोलताना दीपक जाधव म्हणाले, “आपल्या भागाचा विकास करायचा असेल, तर भाजपाला आणि आमदार नितेश राणेंना पर्याय नाही.”
याप्रसंगी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी दीपक जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी पंकज दुखंडे, देवा कदम, नितीन जाधव हे भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.





