अतिवृष्टीने देवगड तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत राष्टवादीने धरले अधिकाऱ्यांना धारेवर

58

 

देवगड (प्रतिनिधी) २९ ऑगस्ट २०२४

 

अतिवृष्टीने देवगड तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत राष्टवादीने धरले अधिकाऱ्यांना धारेवर

 

देवगड तालुक्यातील रस्त्यांचा दुरावस्थेबाबत राष्टवादी काँग्रेसने बांधकाम विभागाच्या अधिाकाऱ्यांना धारेवर धरले.गणेशोत्सवापुर्वी रस्ते दुरूस्त करा व झाडीझुडपे तोडून रस्ते वाहतुकीस सुयोग्य करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

देवगड तालुका शरद पवार गट राष्टवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देवून रस्त्यांचा दुरावस्थेबाबत कनिष्ठ अभियंता श्री.गायकवाड यांना धारेवर धरले. यावेळी राष्टवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, वैभव बिडये, मोंड उपसरपंच अभय बापट, शरद शिंदे, नागेश आचरेकर, निलेश पेडणेकर, सौ.पुनम कुबल, ज्ञानदेव भडसाळे,बाबू वाळके, उदय रूमडे, चंद्रकांत पाळेकर, शिवराम निकम, सुधीर देवगडकर आदी उपस्थित होते.