रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अंदाजे ६४ टक्के मतदान ; कुठेही अनुचित प्रकार नाही
निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांची माहिती
रत्नागिरी :
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी आज सर्वत्र शांततेत आणि सुरळीत अंदाजे ६४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४ लाख ८ हजार ७४५ इतक्या पुरुष तर ३ लाख ९८ हजार ८१६ इतक्या महिला अशा एकूण ८ लाख ७ हजार ५६२ मतदारांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदार संघात मतदानावेळी कुठेही अनुचित प्रकार झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी आज सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने उन्हाची तिव्रता लक्षात घेऊन मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदींची सुविधा केली होती. त्यामुळे मतदारंनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला. आज सांयकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये
२६५चिपळूण – ६९ हजार ७८३ पुरुष, ७२ हजार १७५ महिला असे एकूण १ लाख ४१ हजार ९५८, ५२.६२%,
२६६रत्नागिरी – ८० हजार ७०२ पुरुष, ८२ हजार २२४ महिला, इतर १ असे एकूण १ लाख ६२ हजार ९२७, ५७.४६% ,२६७ राजापूर – ५३हजार ९७१पुरुष, ५६ हजार ६०४ महिला असे एकूण १ लाख १० हजार ५७५, ४७.३१%,२६८ कणकवली – ६४हजार ७८९पुरुष, ६० हजार ७८३ महिला असे एकूण १ लाख २५ हजार ५७२, ५५.१४ % ,२६९ कुडाळ – ६७ हजार ६३३ पुरुष, ६१ हजार ८१७ महिला असे एकूण १ लाख २९ हजार ४५०, ६०.९६% ,२७० सावंतवाडी – ७१ हजार ८६७ पुरुष, ६५ हजार २१३ महिला असे एकूण १ लाख ३७ हजार ८०,६१.०७%,.
लोकसभा मतदार संघातील एकूण १४ लाख ५१ हजार ६३० मतदारांपैकी ८ लाख ७ हजार ५६२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क सायंकाळी ५ वाजेपर्यंत बजावला. ही एकूण टक्केवारी ५५.६३ आहे. अंतिम आकडेवारी रात्री उशीरापर्यंत येण्याची शक्यता असून, ६४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २०१९ च्या लोकसभा मतदानाची टक्केवारी ६१.९९ टक्के इतकी होती. त्या तुलनेत निश्चितच यावेळी मतदानात चांगली वाढ झाल्याचा अंदाज आहे.





