उबाठाला पराभव दिसत असल्याने खोटे नाटे आरोप;आमदार नितेश राणे
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा विजय निश्चित झाला आहे ; आमदार नितेश राणे यांंनी बजावला मतदानाचा हक्क
कणकवली (प्रतिनिधी) ७ मे २०२४
उबाठा सेनेची विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची आमच्यासोबत ताकद नाही पक्षप्रमुखांनी व अन्य नेत्यांनी सभा घेतल्या एवढी आमच्यावर टीका केली पण आतापर्यंत ते लोक एकदाही बोलू शकले नाहीत की विनायक राऊत यांनी काय केले. गेली दहा वर्ष नेमकं या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील मुलांसाठी कोणते रोजगार दिला म्हणून मैदानात हरवू शकले नसल्यामुळे अशा पद्धतीचे आरोप करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची त्यामुळे एक निश्चित पद्धतीने सिद्ध होतं की विरोधकांनी पराभव मान्य केलेला आहे. त्यांना पराभव कळून चुकलेले आहे. कारण नामदार नारायण राणे हे जिंकलेले आहेत. फक्त आता लीड जवळपास साडेतीन लाखाने वाढत चालले आहे.असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला-
2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना नरेंद्र मोदी हे पंतप्रधान हवे होते. त्यामुळे मतदारांनी खासदार विनायक राऊत यांना निवडून दिले. मात्र, मागील 10 वर्षांत राऊत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही विकासात्मक काम केले नाही. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने राऊत यांचा पराभव करून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे हे मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्याचे ठरवले आहे. असे ते म्हणाले.
या मतदारसंघात झालेल्या जादा मतदानाचा फायदा महायुतीला होईल.रत्नागिरी व सिंधुदुर्गातील मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. हे चांगले वातावरण असून दोन्ही जिल्ह्यात झालेले वाढीव मतदानाचा फायदा नारायण राणे यांना होणार आहे.
कोकणात जर आपल्याला परिवर्तन घडवायचे असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विकास घडवायचा असेल तसेच ज्यांनी 35 वर्षे निःस्वार्थीपणे कोकणाची सेवा केली त्यांना अजून पुढची 5 वर्षे सेवा करण्याची संधी देऊन तुमच्या सर्वांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी नारायण राणेंना विजयी करणे आवश्यक आहे. गेली दहा वर्ष येथील विकास थांबला होता, येथील खासदार कोठे होते? असा सवाल त्यांनी केला.





