आंब्रड येथील श्री हनुमान मंदिर येथे आमदार ‌वैभव नाईक यांनी दिली भेट .

18

आंब्रड येथील श्री हनुमान मंदिर येथे आमदार ‌वैभव नाईक यांनी दिली भेट .

*बजरंग बलींचे‌ घेतले दर्शन .*

कणकवली ( प्रतिनिधी)

हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कुडाळ तालुक्यातील आंब्रड बाजारवाडी येथील श्री हनुमान मंदिर येथे कुडाळ -मालवण चे आमदार ‌वैभव नाईक यांनी भेट दिली .आणि बजरंग बलींचे दर्शन घेतले.

यावेळी आमदार वैभव नाईक यांचा आंब्रड बाजारवाडी हितवर्धक संघाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख सचिन परब, सामाजिक कार्यकर्ते ‌आबा मुंज, विपीन भोगटे,आंब्रड ग्रामपंचायत सदस्य सागर वाळके, स्वप्नील मुंज,कुसबे शाखाप्रमुख राजू घाडीगांवकर,कुंटे सरपंच रुपेश तायशेटे यांच्यासह आंब्रड बाजारवाडी हितवर्धक संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते