शिरगाव येथे उद्या हनुमान जन्मोत्सव सोहळा

49

शिरगाव येथे उद्या हनुमान जन्मोत्सव सोहळा

देवगड 

तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात २३ एप्रिल रोजी हनुमान सेवा मंडळाच्यावतीने श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ६.१५ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव, पुजा, आरती, ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता पालखी मिरवणूक, रात्रौ ९.३० वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांस भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन हनुमान सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.