वायंगणी श्री स्वामी समर्थ मठात प्रकटदिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

24

वायंगणी श्री स्वामी समर्थ मठात प्रकटदिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवगड (स्वप्नील लोके)दि ९ एप्रिल २०२४

श्री स्वामी समर्थ मठ, वायंगणी, येथे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा, बुधवार दि. १० एप्रिल २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे, या प्रकट दिन सोहळा निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त आयोजित कार्यक्रम
पहाटे ५ वा ते सकाळी ९ वा.
दुग्ध अभिषेक,सकाळी ७.३० वा.
नित्य आरती,अभिषेक,दुपारी ११ वा. दिंडी भजन,दुपारी १२.३० वा.आरती दुपारी १ वा.महाप्रसाद सायं. ४ ते रात्रौ ८ वा. स्थानिक भजने,रात्रौ ठिक १०.०० वा.लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटय मंडळ,श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ)वायंगणी. मालवण व श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी आयोजित रात्रौ ठिक १०.०० वाजता व्यकटेश पद्मावती लोकराजा कै. सुधीर कलिंगण निर्मित,कलेश्वर दशावतार नाटय मंडळ,नेरुर कुडाळ यांचा ट्रिकसीनयुक्त महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग या व्यतिरिक्त अन्य नयनरम्य देखव्यांचा रोमांच प्रत्यक्ष रंगमंचावर अनुभवा…!! नेरुर यांचा ट्रिकसीनयुक्त नाटयविष्कार व्यंकटेश पद्मावती ट्रिकसीन महाविष्णू दर्शन अधांतरी अंधकाचे बोलके शीर. प्रत्यक्ष रंगमचावर जोत (नांगरणी) अंधकाच्या मुखातून अस्त्र बाहेर पडणे.शिराला धडाची प्राप्ती.
विष्णू मुखातून पान्हा सोडताना गोमाता. विष्णूच्या छातीतून रक्तस्त्राव.मानवी गरुडावर बसून महाविष्णूचे आगमन,स्त्रीचे आत्मदहन,यज्ञ कुंडातून विष्णू दर्शन असा नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.तरी सर्व स्वामी भक्तांनी यावेळी उपस्थितीत राहून श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाचा व तिर्थप्रसाद, महाप्रसादाचा लाभ घ्यावा हि विनंती.असे आवाहन अध्यक्ष श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, श्री स्वामी समर्थ मठ अध्यक्ष वायंगणी यांनी केले आहे.