मिठमुंबरी श्री स्वामी समर्थ मठात उद्या स्वामी प्रकट दिन सोहळा
देवगड (स्वप्नील लोके) ९ एप्रिल २०१४
देवगड तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ मिठमुंबरी येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन सोहळा बुधवार दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मठात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ७.०० ते ८.०० श्री स्वामी समर्थ माऊलींची पूजा.सकाळी ८.०० ते १०.०० अभिषेक, सकाळी १०.०० ते दुपारी १२ .०० श्री स्वामी समर्थ नामजप, दुपारी १२.०० ते १२;३० श्री ची आरती , दर्शन ,दुपारी १२;४० ते ३.०० महाप्रसाद,सायंकाळी ४.०० ते ५ .०० कलाप्रेमी प्रस्तुत अभंगवाणी हा कार्यक्रम सौ मनस्वी घारे व सहकारी देवगड,सायंकाळी ५.०० ते ७.०० स्थानिक भजन, सायंकाळी ७.०० ते ७;३० आरती, सायंकाळी ७:३० ते रात्री ८:३०
भजन बुवा श्री गुणाजी कोयंडे (कोयंडे बंधू प्रासादिक भजन मंडळ कालवी) रात्री ८:३० ते रात्री ९:३० भजन बुवा श्री विघ्नेश तारी बागवाडी मिठमुंबरी आदि कार्यक्रम संपन्न होणार आहेत . सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शन, तिर्थप्रसादाचा, कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ मिठमुंबरी देवगडचे संस्थापक अध्यक्ष श्री आत्माराम गावकर व सर्व स्वामी सेवेकरी मिठमुंबरी मठ यांच्या वतीने करण्यात आले आहे.





