मिठबाव श्री स्वामी समर्थ मठात उद्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
देवगड (प्रतिनिधी)दि ९ एप्रिल २०२४
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ मिठबावच्या वतीने मिठबाव येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ प्रगटदिन सोहळा बुधवार दि. १० एप्रिल २०२४ रोजी साजरा होणार आहे.या निमित्ताने मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने होणारे कार्यक्रम
बुधवार, दि. १० एप्रिल २०२४ सकाळी ८ ते १० वा. : श्री स्वामी पादूका व इतर देवांवर अभिषेक व पूजा, सकाळी ९ ते १० वा.श्री स्वामी समर्थ सारामृत पोथी पारायण, सकाळी १० ते १२ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी १२.३० ते १ वा. आरती, मंत्रपुष्प,दुपारी १ ते २ वा महाप्रसाद,सायं. ५ ते ६ वा,सायं.श्री स्वामी समर्थ महिला भजन मंडळाचे सुस्वर भजन,६ ते ७ वा श्री स्वामी समर्थ पालखी मिरवणूक सोहळा, सायं. ७ ते ८ वा, आरती मंत्र पुष्प,रात्रौ १० वा.
ब्राह्मणदेव महिला मंडळ,नाद-भोळेवाडी यांचे थरारक “समईनृत्य” आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व स्वामी भक्तांनी सहकुटुंब व मित्रमंडळींसह कार्यक्रमासउपस्थित राहून श्री स्वामी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ मिठबाव च्या वतीने करण्यात आले आहे.





