कणकवली पोलीस निरीक्षकपदी समशेर तडवी यांनी स्विकारला पदभार

89

कणकवली पोलीस निरीक्षकपदी
समशेर तडवी यांनी स्विकारला पदभार

कणकवली (प्रतिनिधी)दि १३ मार्च २०२४

कणकवली पोलीस निरीक्षकपदी समशेर तडवी यांनी पदभार स्विकारला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण येथील वाशिम पोलीस ठाण्यातून त्यांची कणकवली येथे बदली झाली, त्यानुसार त्यांनी कणकवली पोलीस ठाण्याचा गुरुवारी पदभार स्वीकारला. त्यांनी पोलीस विभागात गेली १५ वर्षे सेवा बजावली आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावली आहे.