फुटलेल्या मोरीवर डांबरीकरण करून जनतेची फसवणूक

20

फुटलेल्या मोरीवर डांबरीकरण करून जनतेची फसवणूक

तेंडोली रस्ता ते गणेश मंदिर येथील रस्ता

 

वेंगुर्ला (प्रतिनिधी) दि १३ मार्च २०२४ 

 

तेंडोली रस्ता ते गणेश मंदिर येथे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या मोरीच्या ठिकाणी पाईप न घालता फुटलेल्या पाईपवर मोरीच्या ठिकाणी डांबरीकरण करून जनतेची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वायंगणी माजी सरपंच सुमन कामत व माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नाईक यांनी केली आहे.

तेंडोली रस्ता ते गणपती मंदिर व गणपती मंदिर सागरी महामार्ग ते तेंडोली रस्ता अशा दोन ठिकाणी सध्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे.
सागरी महामार्ग ते तेंडोली रस्ता या रस्त्याचे काम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम त्या रस्त्याला जोडून न करता तेंडोली रस्ता ते गणेश मंदिराच्या दिशेने करण्यात येत होते एक काम करत असताना सदर मोरीवर पाईप न घालता डांबरीकरण केले जात असल्याची बाब लक्षात येतात सुमन कामत व सुनील नाईक यांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत जाब विचारला व संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवून घेण्यास सांगितले मात्र याबाबत योग्य उत्तर न मिळाल्याने सुमन कामत व सुनील नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
माझी लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणारे व रस्त्याचे नारळ फोडून श्रेय घेणारे यांनी हे बोगस काम होताना डोळेझाक का केली असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.