प्रेरणा महिलामंडळचा आगळावेगळा महिला दिन ; दयासागर छात्रालयात विद्यार्थ्या सोबत साजरा केला

26

प्रेरणा महिलामंडळचा आगळावेगळा महिला दिन ; दयासागर छात्रालयात विद्यार्थ्या सोबत साजरा केला

बांदा (प्रतिनिधी) ता. १३ मार्च २०२४

येथील प्रेरणा महिला मंडळाच्या सर्व भगिनींनी यावर्षीचा आपला महिला दिन एका आगळ्या पद्धतीने साजरा केला ऋणपार येथील सुरू असलेल्या दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंची भेट व रोख रक्कम देऊन हा महिला दिन साजरा केला गेला स्वामी दयानंद सरस्वती यांच्या प्रेरणेतूनअखिल भारतीय सेवा अभियान चेन्नई या संस्थेने समाजातील गरीब गरजू मुलांसाठी अनेक छात्रालये भारतामध्ये सुरू केलेली आहे त्यापैकी एक
रोणापालतील हे छात्रालय होय वेळी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी शास्त्रालयाचे सर्व कामकाज पाहून समाधान व्यक्त केले छात्रलयात मुलांची अभ्यासाची प्रगती पाहूनही उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले या छात्रालयातील मुले भविष्यात भारताचे सुजाण नागरिक बनतील स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी सर्व जे काही घडत आहे त्याला खरोखरच स्वामीजींची कृपा असल्याचे मत व्यक्त करून भविष्यात हि मुले भारताची सुजाण नागरिक म्हणून वावरतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केलायावेळी मुलांनी आपल्या अंगभूत गुणांनी अनेक कार्यक्रम करून दाखवले त्यावेळी मंडळाच्याउपाध्यक्ष प्राची नार्वेकर, सेक्रेटरी रेश्मा सावंत, श्वेता कोरगावकर, सुप्रिया बर्वे, सुवर्णलता धारगळकर, सुचिता चिंदरकर, भक्ती साळगावकर, अश्विनी नाटेकर,जयश्री नार्वेकर, मंगल मयेकर,अनुजा साताडेॅकर, अवंती पंडीत, माधवी गाड,लीना गोवेकर,अंकिता चिंदरकर, नीहारिका चारी,रश्मी पेडणेकर, मनिषा राऊळ, साक्षी धारळकर व व्यापारी बंधू ही उपस्थित होते
जीवनावश्यक वस्तू आणि रोख रक्कम 10,000/ दिली