चिव्याच्या दांड्याने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी लिंगडाळ येथील एकावर गुन्हा दाखल

56

चिव्याच्या दांड्याने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी लिंगडाळ येथील एकावर गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी)

वेळोवेळी मारण्याची धमकी देऊन आरे फाटा जवळ गाडी अडवून वळीवंडे येथील शिवाजी करपे यांना चिव्याच्या दांड्याने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी लिंगडाळ येथील सचिन लोके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २१ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास देवगड निपाणी मार्गावर आरे फाटा जवळ घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वळीवंडे पोखरबाव येथील शिवाजी मरगु करपे वय 45 यांना सचिन लोका वय ३५ राहणार लिंगडाळ यांनी वेळोवेळी मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या गाडीने देवगड नांदगाव मार्गावरून वळीवंडे येथे जात असताना आरे फाटा येथील उताराजवळ सचिन लोके यांनी त्यांच्या गाडीच्या समोर आपली गाडी आडवी लावून हाताच्या धपाट्याने कानाखाली लागली. त्यानंतर गाडीतील चिव्याचा दांडा काढून करपे यांच्या डोक्यात मारल्याने ते एका कुशीवर खाली पडले. त्यानंतर त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीवर, डाव्या बाजूच्या कमरेवर, डाव्या हाताच्या पंजावर,व कोपरावर दांड्याने मारून दुखापत केली. या प्रकरणी शिवाजी करपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सचिन लोके याच्याविरुद्ध भा.द.वि कलम 324, 323, 341 ,506 गुन्हा दाखल केला आहे. याबाबतच्या अधिक तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करत आहेत.