शेर्ले रवळनाथ जत्रा बुधवार २४ रोजी
बांदा (प्रतिनिधी)
शेर्ले येथील श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार २४ जानेवारी रोजी साजरा होत आहे. ही जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई, गोवा सह जिल्हाभरातील भाविकांची मोठी गर्दी होते.
यानिमित्त सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक होईल. त्यानंतर देवास केळी ठेवणे, नवस बोलणे – फेडणे आदी कार्यक्रमांना प्रारंभ होईल. रात्री पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर भाविक लोटांगणे घालून नवस फेड करतील. त्यानंतर मध्यरात्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान उपसमिती व समस्त शेर्ले ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.





