कुणकेश्वर मंदिर येथील स्वच्छता अभियान मोहिमेत केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे सहभागी
देवगड (प्रतिनिधी)
अयोध्येतील श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या स्वच्छता अभियान कार्यक्रम अंतर्गत सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी कुणकेश्वर मंदिर येथे स्वच्छता अभियान कार्यक्रमास सहभागी होऊन मंदिराची साफसफाई मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार अँड अजित गोगटे, तहसिलदार विशाल खत्री , कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी,अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.






