१८ जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांनी घेतले संस्काराचे धडे
देवगड (प्रतिनिधी)
सेवा भारती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा, फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प, देवगड यांनी आयोजित केलेले तीन दिवसीय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर शुक्रवार दि. १२ ते रविवार दि. १४ जानेवारी २०२४ या कालावधीत श्री भवानी मंगल कार्यालय, चांदोशी येथे संपन्न झाले.
या तीन दिवसीय निवासी शिबिरात देवगड तालुक्यातील १८ जि. प. शाळांतील ८८ मुली व ५६ मुलगे असे एकूण १४४ शिबिरार्थी पूर्णवेळ सहभागी झाले होते.
या शिबिरामध्ये विज्ञान व राष्ट्रभक्ती या विषयांवर ९ बौद्धिक सत्रे व ४ शारीरिक सत्रे आयोजित
करण्यात आली होती. या शिबिरात भारतमाता पूजनाचा विशेष लक्षवेधी कार्यक्रम पार पडला. शिबिराच्या उद्घाटन
प्रसंगी डॉ. श्री. किरण हिंदळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिबिरात श्री. आनंद राजम, शिबीर कार्यवाह, श्री. सुरेंद्र शर्मा, संघटन मंत्री, सेवा भारती कोकण प्रांत, आणि श्री. हेमंत आईर, प्रयोगशाळा विषय प्रमुख, सेवा भारती कोकण प्रांत हे पूर्णवेळ उपस्थित होते. या शिबिराला श्री. विलास तावडे, मा. अध्यक्ष, सेवा भारती कोकण प्रांत, श्री. धनंजय जठार, शिक्षण आयाम प्रमुख, सेवा भारती कोकण प्रांत, श्री. महेश कानेटकर,कार्यवाह, रा. स्व. संघ, देवगड तालुका, ॲड. श्री. अजित गोगटे, माजी उपाध्यक्ष, रा. स्व. संघ जनकल्याण समिती,कोकण संभाग यांनी भेट दिली. तसेच ४९ पालक, शिक्षक, हितचिंतक, देणगीदार यांनी सदिच्छा भेट दिली.
हे यशस्वी पार पडण्यासाठी प्रयोगशाळा प्रकल्पाचे २७ माजी विद्यार्थी, प्रकल्प समिती सदस्य,जिल्हा समिती सदस्य यांनी अहोरात्र परिश्रम केले.





