सामान्य विज्ञान स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा चांदोशी येथे सन्मान
देवगड (प्रतिनिधी) दि २१
सामान्य विज्ञान स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सेवाभारती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा, फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प, देवगड यांनी दि. २९ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित केलेल्या जयंतराव सहस्रबुद्धे सामान्य विज्ञान स्पर्धा परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या पहिल्या ५ विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा रविवार दि. १४ जानेवारी २०२४ रोजी श्री भवानी मंगल कार्यालय,चांदोशी येथे पार पडला.
सेवा भारती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा, फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प, देवगड यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देवगड तालुक्यातील प्रकल्पाच्या सेवीत २१ जि. प. शाळांतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची
पाठ्यक्रमावर आधारित १०० गुणांची सामान्य विज्ञान स्पर्धा आयोजित केली होती. या परीक्षेत एकूण १५५ विद्यार्थी
प्रविष्ठ झाले होते.
यामध्ये कु. आर्या दयानंद कदम (शाळा पाटथर) व कु. जान्हवी प्रेम पाळेकर (शाळा पाळेकरवाडी नं. १) या दोघींनी समान गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन केला, कु. निनाद भक्तप्रल्हाद गावडे (शाळा कुणकेश्वर- कातवण) व कु. श्रावणी महेश पाटोळे (शाळा आरे- देवीची वाडी) या दोघांनी समान गुण मिळवून द्वितीय क्रमांक संपादन केला तसेच कु. मधुरा प्रकाश ठुकरूल (शाळा इळये नं. १) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि भेट म्हणून आवळ्याचे रोप प्रदान करून गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमास श्री. सुरेंद्र शर्मा, संघटन मंत्री, सेवा भारती कोकण प्रांत, श्री. हेमंत आईर,प्रयोगशाळा विषय प्रमुख, सेवा भारती कोकण प्रांत, महेश कानेटकर, कार्यवाह, रा.स्व.संघ, देवगड तालुका तसेच पालक, शिक्षक, विद्यार्थी, प्रयोगशाळा प्रकल्प समिती सदस्य, जिल्हा समिती सदस्य उपस्थित होते.









