लेह, लडाख हादरले! पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
लडाख
लेह लडाखमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, लेह आणि लडाखमध्ये मंगळवारी पहाटे ४:३३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू ५ किमी खोलीवर होता आणि ३४.७३ अक्षांश आणि ७७.०७ रेखांशावर हादरे बसले.
जम्मू आणि काश्मीरच्या जवळच्या किश्तवाड जिल्ह्यात ३.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. एनसीएसनुसार, किश्तवाडमध्ये सकाळी १.१० वाजता भूकंप ५ किमी खोलीवर झाला. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.





