पत्रकार निलेश मोरजकर यांना या संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
सावंतवाडी (हेमंत मराठे)
बांदा येथील पत्रकार निलेश मोरजकर यांना ब्लू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर जिल्हा सोलापूर या संस्थेचे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला असून त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते सात जानेवारी 2024 रोजी पंढरपूर येथे होणार आहे . श्री मोरजकर हे गेली वीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत . त्यांचे पत्रकारितेबरोबर सामाजिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात देखील योगदान आहे. जिल्ह्यातील रक्तदान चळवळीत त्यांच्या सहभाग आहे . त्यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.





