तैवान २ शक्तीशाली भूकंपांनी हादरला, ६.३ तीव्रतेच धक्के; नागरिकांचा पळापळ
तैवान: तैवानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाच्या जोरदार धक्क्यांना हादरला आहे. नागरिकांमध्ये या भूकंपामुळे भीतीचं वातावरण आहे. भूकंपाची तीव्रता खूप जास्त असली तरी कुठूनही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
तैवानमध्ये लागोपाठ दोनदा भूकंपाचे झटके जाणवल्याचे सांगण्यात येत आहे.
तैवानमध्ये रविवारी पहाटे अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर लोक कुटुंबासह बाहेर पळाल्याचं दिसून आलं. लोकांची मोकळ्या जागी पोहोचण्यासाठी धावपळ सुरु होती. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी नोंदवण्यात आली असून ती खूप जास्त आहे.
जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (जेएफझेड) च्या हवाल्याने वृत्तसंस्था रॉयटर्सने वृत्त दिले आहे की, रविवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याचे केंद्र 10 किलोमीटर (6.21 मैल) खोलीवर होते. भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल एवढी मोजली गेली. मात्र या भूकंपामुळे तैवानमध्ये काही नुकसान झाले आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.





