शौर्या तुला वंदितो आणि गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम जामसंडेत संपन्न

233

*शौर्या तुला वंदितो* आणि गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम जामसंडेत संपन्न

देवगड (स्वप्नील लोके)

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था गेली 16 वर्षे अखंडपणे गडकिल्ले जतन व संर्वधनचे कार्य करत आहे. गडकिल्ले जतन व संर्वधन कार्य करत असताना अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जातात. याचाच एक भाग म्हणजे भारत देशाच्या संरक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करून देशसेवेतून निवृत्त माजी सैनिक, स्वातंत्र्य सेनानी यांच्या शौर्य आणि साहसाप्रती कृतज्ञता – ऋण व्यक्त करणे यासाठी दरवर्षी संस्थेच्या विविध विभागामार्फत माजी सैनिकांच्या करिता *शौर्या तुला वंदितो* आणि गुणवंत विद्यार्थी करीत गुणगौरव कार्यक्रम आयोजित करत असतात. यावर्षीचा *शौर्या तुला वंदितो व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम* देवगड येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कुल, जामसंडे या शाळेच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातिला बिडवाडी – कणकवली येथील माजी सैनिक श्री कावले यांच्या लहान मुलांच्या टीमकडून शाळेच्या पटांगणात मल्लखांब व लाठीकाठीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आली.

­त्यानंतर सर्व माझी सैनिक यांना देवगड कॉलेज NCC युनिटच्या विद्यार्थिनी कडून संचलन करून मानवंदना देत तसेच दुर्गसेविकाकडून औक्षण करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत आले. यावेळी अमर जवान यांना संस्थेचे संस्थापक श्री श्रमिक गोजमगुंडे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
देवगड तालूका व पंचक्रोशीतील 10 माजी सैनिक व स्वातंत्र्य सेनानी यांना शाल, श्रीफळ,गुलाबपुष्प व सहयाद्री शौर्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक आणि कोरोना काळात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कोरोना योद्धांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी यांना सह्याद्री गुणगौरव सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यादरम्यान गडकिल्ले जतन आणि संवर्धन 16 वर्षे अविरतपणे चालू ठेवले असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रमिक गोजमगुंडे सर यांना श्री दुर्गामाता कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग यांच्या कडून श्रमिक सर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कॅप्टन भारतीय नौसेना तथा प्रादेशिक बंदर अधिकारी श्री संदीप भुजबळ, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक श्री श्रमिक गोजमगुंडे, माजी आमदार श्री अजित गोगटे, श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावचे अध्यक्ष तथा मिठबाव ग्रामपंचायत सरपंच श्री महादेव उर्फ भाई नरे , माजी सैनिक श्री रघुनाथ धुळप, श्री प्रकाश पुजारे, श्री मनोहर देवधर, श्री प्रसाद नाडकर्णी , श्री अरविंद सुके , श्री बाळकृष्ण कावले , श्री विठ्ठल बिर्जे याचसोबत सौ पी पी खानविलकर निवृत्त आरोग्य सेविका, देवगड कॉलेज NCC युनिटच्या लेफ्टनंट ढेरे मॅडम, शिवशंभो सामजिक मंडळ फोंडाघाटचे अध्यक्ष श्री अशोक लाड , श्रीदुर्गामाता मंडळ विजयदुर्ग च्या सचिव सौ आळवे , मालवण बंदर निरीक्षक श्री गोसावी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.. कार्यक्रमातील उपस्थित विद्यार्थी आणि दुर्गसेवक – दुर्गसेविकांना माजी आमदार श्री अजित गोगटे , कॅप्टन श्री संदीप भुजबळ आणि संस्थेचे संस्थापक श्री श्रमिक गोजमगुंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या सर्व दुर्गसेवक – दुर्गसेविका यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार… सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गसेवक सिद्धेश परब यांनी केले तर आभार दुर्गसेवक दिपक करंजे यांनी केले.