- सावंतवाडी : सावंतवाडी तालुका मराठा समाजाची रविवारी संध्याकाळी होणारी बैठक उद्या क्रिकेट विश्व चषकाचा अंतिम सामना असल्याने रद्द करावी, अशी मागणी बऱ्याच जणांनी केल्यामुळे उद्या रविवारची बैठक रद्द करून ती आज संध्याकाळी ठीक ५ वाजता आर पी डी हायस्कूलमध्ये होणार आहे.
सदर बैठकीत मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत त्याचे नियोजन करायचे आहे.व इतर गोष्टींवर साधक बाधक चर्चा होणार आहे तरी सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती सकल मराठा समाज अध्यक्ष सावंतवाडी तालुका श्री. सिताराम गावडे यांनी केली आहे.





