कणकवली : तालुक्यातील कनेडी हायस्कूल व जुनिअर कॉलेज कनेडीचे खेळाडू कु. संदेश संजय सावंत याने ॲथलेटिक्स स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात तीनशे मीटर धावणे या प्रकारात तर कु. रेखा लिंगप्पा पुजारी हिने 19 वर्ष वयोगटात 3000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर यश प्राप्त केले असून दोघांची निवड सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. या दोन्ही खेळाडूंना प्रशालेचे पर्यवेक्षक तथा क्रीडा मार्गदर्शक बयाजी बुराण यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्था अध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाने अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेसाठी दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
Home महाराष्ट्र कणकवली कनेडीच्या खेळाडूंचा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत डंका.! ; कोल्हापूर विभागीय स्पर्धेत करणार सिंधुदुर्ग...





