सहवेदना – सचिन नाटेकर यांचे निधन.!

38

बांदा : बांदा येथील मांगल्य फुटवेअरचे मालक तथा बांदा व्यापारी संघाचे सदस्य सचिन अरविंद नाटेकर (वय ४५) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. बांद्यातील समाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते. स्पष्टवक्तेपणा व अभ्यासूपणे ते प्रश्न मांडत. सर्वसामान्यांच्या समस्या, व्यापारी वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न होते. गेले काहि दिवस ते आजारी होते. काल रात्री त्यांचे निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, भाऊ, भावजय, पुतणी, विवाहित बहीण, चुलत भाऊ, काका असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने बांदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कापड व्यापारी निलेश नाटेकर यांचे ते बंधू होत.