शिरोड्यात रंगणार कोजागरी कविसंमेलन.! ; इतरही कला सादरीकरणास देणार संधी.

86

शिरोडा : र. ग. खटखटे ग्रंथालय, शिरोडा आणि साहित्य प्रेरणा कट्टा, आजगाव यांचे संयुक्त विद्यमाने खटखटे ग्रंथालयात शुक्रवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कोजागरी कविसंमेलन आयोजित केले आहे. कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला होणारे हे कविसंमेलन सर्वांसाठी खुले आहे. कविता स्वरचित असावी किंवा अन्य कविताही सादर करता येतील, पण त्यावेळी मूळ कवीचे नाव सांगणे आवश्यक आहे.
तसेच कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गीतगायन, नाट्यछटा आदी कलाही सादर करता येतील. तरी कविता सादर करू इच्छिणाऱ्यांनी वा इतर कला सादर करू इच्छिणाऱ्यांनी आपली नावे गुरुवार दि. २६ ऑक्टोबरपर्यंत ग्रंथालयात नोंदवावीत, असे आवाहन दोन्ही संस्थांमार्फत करण्यात आले आहे.