देवगड तालुका भाजपच्या वतीनेही मविआ सरकारने काढलेला कंत्राटी भरती निवड प्रक्रियेचा केला निषेध..!

100

देवगड : उद्धव ठाकरे हाय हाय… शरद पवार हाय हाय… ठाकरे, शरद पवार, काँग्रेस यांचा निषेध असो.. माफी मागा माफी मागा,उद्धव ठाकरे माफी मागा.. अशा प्रकारच्या घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सरकारमध्ये चुकीच्या पद्धतीने केलेल्या कंत्राटी नोकर भरती प्रक्रियेचा निषेध केला. तर ही कंत्राटी नोकर भरती भारतीय जनता पार्टीच्या महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली रद्द केल्याबद्दल अभिनंदन केले.

देवगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवगड तालुका भाजपा कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी पूर्वी असलेल्या ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना कंत्राटी पद्धतीने नोकर भरती केली होती त्याचा निषेध केला. यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजपाचे पदाधिकारी दया पाटील, योगेश पाटकर,गटनेते शरद ठुकरुल, नगरसेवक तन्वी चांदोस्कर, रवींद्र चिंदरकर,माजी नगराध्यक्ष प्रियांका साळसकर,नगरसेविका मनीषा जामसंडेकर,माजी नगरसेवक बापू जुवाटकर, महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुसकर , तन्वी शिंदे,आदी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.