अभिमानास्पद – सावंतवाडीच्या कळसुलकरचा खेळाडू प्रतीक जाधव राज्यस्तरावर खेळणार.!

30

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली आणि जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच सांगली येथे पार पडलेल्या विभागीयस्तर ॲथलेटीक स्पर्धेत कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी या प्रशालेचा खेळाडू प्रतीक महेश जाधव याने सतरा वर्षे वयोगटाखालील लांब उडी प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळवत राज्यस्तरावर आपले नामांकन निश्चित केले आहे. प्रतीकचे संस्थाध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व पालक वर्गाकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.