अभिमानास्पद – प्रथमेश गावडेची महाराष्ट्र क्रिकेट सिनियर संघात निवड.! ; लवकरच दिसणार IPL मध्येही.

428

सावंतवाडी : आंबोली (सतीचीवाडी) येथील आणि सावंतवाडी येथे देशभक्त गव्हाणकर कॉलेज मध्ये BMS च्या तिसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी कु. प्रथमेश पुंडलिक गावडे याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सिनियर खेळाडूंच्या (२३ वर्षाखालील) संघात निवड झाली. या अगोदर तो महाराष्ट्राच्या U-19 वर्षाखालील संघातून खेळत होता. BCCI तर्फे राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणीमध्ये हि त्याला सहभागी करण्यात आलेले आहे.
नुकत्याच झालेल्या MPL महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्याच सत्रात सोलापूर संघातर्फे खेळत त्याने दर्जेदार आणि दमदार खेळी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. राष्ट्रीय पातळीवर BCCI तर्फे घेण्यात येणाऱ्या कूच बिहार ट्रॉफी आणि विणू माकंड ट्रॉफीमध्येही खेळत त्याने दमदार असे खेळाचे प्रदर्शन करून दाखवले आहे. वेगवान गोलंदाज    तसेच तडफदार फलंदाज म्हणून खेळताना त्याने सर्वच पातळीवर आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन सर्वाना दाखवून दिलेले आहे. सांगेली (घोलेवाडी) येथील बापू आईर यांचा तो नातू आहे.
याच्या यशामागे त्याची आई उज्वला पुंडलिक गावडे आणि वडील पुंडलिक गावडे (माजी सैनिक) यांचे अहोरात्र प्रयत्न आहेत. येत्या कही काळात हा आपल्या तालुक्यातील खेळाडू IPL सारख्या स्पर्धेमध्येही दिसेल असे रोजगार रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी काढले.