धाकोरा येथे उद्या रंगणार ‘खेळ पैठणीचा.!’ ; सुप्रसिद्ध निवेदक प्रा. रुपेश पाटील आणणार हास्य, मनोरंजन आणि ज्ञानासोबत खेळ पैठणीत रंगत.

80

सावंतवाडी : तालुक्यातील धाकोरा येथे उद्या रविवार दिनांक 22 रोजी सायंकाळी 6 वाजता नवरात्र उत्सवानिमित्त श्री पावणाई देवी मंदिर धाकोरा येथे खास महिलांसाठी पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. यावेळी ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम संपन्न होणार असून सुप्रसिद्ध निवेदक आणि व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील हास्य, मनोरंजन आणि ज्ञानासोबत खेळ पैठणीचा घेणार आहेत. हा कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी एक सुवर्णसंधी असून खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा महिलांनी लाभ घ्यावा असे आयोजक श्री पावणादेवी सेवा ट्रस्ट धाकोरे आणि धाकोरे ग्रामस्थ यांनी कळविले आहे.

अशी असणार महिलांसाठी खास बक्षिसे –
पहिली पैठणी कै. शुभदा बाळकृष्ण मुळीक यांच्या स्मरणार्थ वंदना सागर तावडे देवगड यांच्याकडून…

दुसरी पैठणी कै. सुप्रिया विजयकुमार मुळीक यांच्या स्मरणार्थ विजयकुमार दत्ताराम मुळीक यांच्याकडून…
तर तिसरी पैठणी गुरुदत्त अंकुश गवस यांच्यातर्फे….

महिलांनी भाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद आणि पैठणी जिंकावी अशी विनंती आयोजकांनी केली आहे..

ठिकाण – श्री पावणाई देवी मंदिर धाकोरा…