खळबळजनक – युवतीच्या प्रियकरानेच दोन मित्रांसह केला अत्याचार !; कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल.

243

कणकवली : पीडित युवतीच्या प्रियकराने आपल्या दोन मित्रांसोबत स्वतःच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत कणकवली तालुक्यातील दोन आणि राजापूर तालुक्यातील एका युवकावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सदर पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेच्या प्रियकराने युवतीला जबरदस्ती करुन दारू पाजली. त्यांनतर त्याने स्वतः आणि त्याच्या दोन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना दारूमच्या माळरानावर १५ ते १६ ऑक्टोबरच्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
सदर पीडित युवती ही कणकवली तालुक्यालगतच्या तालुक्यातील असून तळेरे येथे कामास होती.
याबाबत कणकवली तालुक्यातील दारूम, नादशिरवल आणि राजापूर तालुक्यातील केळवली गावातील युवकांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.